बार्शी – विद्यार्थ्यांना दररोज ज्ञानदानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी आज व्यवहारज्ञानाची जोड देत आनंद बाजाराचे उपळाई (ठों) शाळा नंबर २ येथे आयोजन केले होते. या बाजारात अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या यांच्या स्टॉल बरोबरच पाणीपुरी, वडापाव, सँडविच, इडली सांभार, पॅटिस, भेळ, दही धपाटे यांचे स्टॉल उभे करण्यात आले होते. जवळपास ७० ते ७५ स्टॉल होते.
मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूचे स्टॉल असल्याने असंख्य महिला, पालकांनी गर्दी केली होती. या स्टॉलमधून जवळपास ३५ हजार रुपयांची उलाढाल झाली. या आनंद बाजराचे उदघाटन माजी सरपंच विजय ठोगे, सुरेश मोरे, भालचंद्र जामदार, भोंग माजी उपसरपंच जयवंत कदम, रमेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या आनंद बाजाराला भेट देण्यासाठी व वस्तू खरेदीसाठी गावातील युवा उद्योजक नसिरभाई शेख, माजी उपसरपंच आण्णासाहेब लुंगसे, संतोष पाटील, आकाश खोडवे, प्रवीण वैद्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ, सविता भोंग, सदस्य सतीश शिंदे, सोसायटीचे चेअरमन काकासाहेब जामदार, सतीश ठोगे, सुहास ठोगे यांनी भेटी दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा शाळेच्यावतीने साकार केला. आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आनंद घाडगे, प्रभाकर काटे, रामचंद्र बरचे, हरिभाऊ दळवी, श्रीमती वैशाली खुने, श्रीमती सुवर्णगौरी शिंदे, श्रीमती मीरा गरड, श्रीमती दिपाली गोरे यांनी परिश्रम घेतले.

















