करकंब – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेमळा येथे बझार डेचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन करकंबचे माजी सरपंच आदिनाथ देशमुख,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबुराव जाधव,ऑडवोकेट शरदचंद्र पांढरे,केंद्रप्रमुख मोरे,शिक्षक संतोष कापसे शालेय समिती अध्यक्ष महेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक किशोर गोडसे, सहशिक्षक शरद गावडे,माजी अध्यक्ष संजय सलगर,विठ्ठल सलगर,पोपट कापसे,तानाजी सलगर इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी आदिनाथ देशमुख यांनी आंबेमळा शाळेची गुणवत्ता चांगली असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला पट आहे.
विद्यार्थ्यांना येथे गोडी लागत आहे.पुढील काळातही काही अडीअडचणी असतील तर त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.येथील पालकांचाही सहभाग चांगला असून वेळोवेळी मदतीचा हात त्यांनी या शाळेसाठी दिला आहे.असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी विविध, प्रकारच्या, पालेभाज्या, फळभाज्या,खाद्यपदार्थ,खेळणी,चहा कॉफी याठिकाणी विक्रीसाठी आणले होते. विद्यार्थी शिक्षक पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बजार डेमधील वस्तू खरेदी केल्या.
या बझार डेमध्ये जवळपास १५ ते १६ हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे सहशिक्षक शरद गावडे यांनी सांगितले.यावेळी पेहे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलंकापुरी येथील शिक्षक विशाल रेपाळ यांना त्यांच्या गणित शाळा या उपकरणास जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने त्यांचा तसेच पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीत निवड झाल्याने वार्ताहर लक्ष्मण जाधव यांचा सन्मान माजी सरपंच आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.


























