‘महाराष्ट्र इस्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्र’वर मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र अजय आशर यांची वर्णी लागल्यानंतर आता निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील ठाण्यातील बिल्डर अजय आशर यांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. त्याच्यासोबत माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांचीही नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. आता निवृत्ती सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षे किंवा सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत त्यांची नियुक्ती राहील.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...