तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी मंदिर संस्थान सह शिष्टमंडळाने शुक्रवार दि २५ रोजी शिर्डी येथे भेट देवुन तेथे भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांची पाहणी केली .
यात नवीन दर्शन मंडप दर्शनव्यवस्था मंदीर परिसर दर्शन रांगा अन्नछञ लाडु प्रसाद वितरणविभाग भक्त निवास वाहनतळ मंदीर पाणी स्ञोञ कर्मचारी व सुरक्षारक्षक कामकाज पाहणी केली तसेच शिर्डीसंस्थान देत असलेले शिक्षण हाँस्पीटलमाध्यमातुन देत असलेली आरोग्य सुविधा सह इतर उपक्रमाची माहीती घैतली तसेच शिर्डी संस्थान मंदीर बरोबरच शहर परिसरात भाविकांन साठी सोयी सुविधा दैत असल्याचे यावेळी सांगितले .
या पुर्वी तिर्थक्षेञ बालाजी तिर्थक्षेञ पंढरपूर शिर्डीची पाहणी झाली असुन यानंतर शेगाव उज्जैन या तिर्थक्षेञी पाहणीसाठी शिष्टमंडळ भेटी देवुन पाहणी करणार असल्याचे समजते या शिष्टमंडळात
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तथा जिल्हाधिकारी डाँ सचिन ओंबासे देविचे महंत तुकोजीबुवा मंदीर प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे तिन्ही पुजारी मंडळाचे प्रतिनिधी तसेच विकास आराखड्या संदर्भात सर्व खात्याच्या प्रमुखांचा यात समाविश होता.