मौजे धनेगाव येथील येमाई तलावातील पाणी सोडण्याचे गेट नादुस्त असल्याने शेतीला पाणी सोडता येत नव्हते अखेर शुक्रवार दि २४ रोजी अथक प्रयत्ना नंतर गेट दुरुस्त केल्याने कँनाल माध्यमातून शेतीला पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील मौजे धनेगाव येथील येमाई ल पा तलावातील पाणी सोडण्याच्या विहरीतील गेट काही विघ्नसंतोषी लोकांनी जाणुनबुजुन खराब केले होते त्यामुळे गेट वर सरकत नसल्याने पाणी कँनाल मध्ये सोडता येत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांचे रबी पिक वाळुन जात असल्याने अखेर शुक्रवार २४ रोजी लघुपाटबंधारे तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी सोडण्याचे गेट प्रयत्न करुन उघडल्यानै अखेर शुक्रवार दि २४ पासुन कँनाल.मधुन पाणी शेतीला सोडण्यास सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी जगदंबा संस्थेचे चेअरमन विकास जाधव लघुपाटबंधारे अभियंते मलिकार्जुन पाटील शाखा अभियंता कुंभारे लोढे बालाजी सुरवसे सह लाभधारकृ शेतकरी उपस्थितीत होते.