राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांचेसह २६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर गावाचे हद्दीत चांगदेव मंगलू राठोड, वय ४५ वर्षे, राहणार कोंडी तांडा, ता. उत्तर सोलापूर हा इसम त्याच्या दुचाकीवरून १२० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत रुपये पासष्ट हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरात दोन मोटरसायकलींसह २०० लिटर ताडी जप्त केली असून आबादास चिंचोळ या इसमास अटक केली असून एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक गुलाब जाधव, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान योगिराज तोग्गी, वसंत राठोड यांनी पार पाडली.