मागील काही दिवसांपासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते किरीट सोमय्या – यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट कंपनी, एम पी एंटरप्राईस, बेस्ट ( मुंबई महापालिका) व अन्य कंपन्या विरुद्ध १००० कर्मचाऱ्यांची फसवणूक करणे, पगार न देणे, प्रोविडन्ट फंड हडप करणे त्याविरोधात कलम 406,409,34 भा दं वि अंतर्गत कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.