दक्षिण सोलापूर – कंदलगाव येथील जीवन ज्योत प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पाडला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मंद्रुप महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जवाहर मोरे हे होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एम.कमळे होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करुन शाळा,शिक्षक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सहशिक्षक चेतन आवटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
मार्गदर्शन करताना प्रा डॉ जवाहर मोरे म्हणाले की, दहावीचे वर्ष म्हणजे शिक्षणाचा पाया आहे. हा पाया भक्कम होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चांगला नियमित अभ्यास करावा व उत्तीर्ण व्हावे. महामानव व विचारवंत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आचरण करत आई वडील व गुरुजनांची स्वप्नं पूर्ण करावीत. मोबाईलच्या नादाला लागून वेळ व बुद्धी वाया घालवू नका. उंच ध्येय गाठण्याचे हेच वय असून उत्साही व आनंदी वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी राबवावे असे मोलाचे सल्ले दिले.
प्रास्ताविक सहशिक्षक दिपक कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृध्दी कोले हिने केले तर आभार रेणुका बिराजदार हिने मानले.




















