सोलापूर – सोमवारी दुपारी मंद्रूप व भंडारकवठे परीसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व कांदा यांच्यासह द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हवामान विभागाने आठ दिवसापूर्वीच २३ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवार २० फेब्रुवारी पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाले. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांवर संकट कोसळला आहे. तर गहू, ज्वारी व हरभरा पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्षे पिकावर परीणाम झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत दिसून येत आहे. यामुळे गहू व ज्वारी पिकांच्या उत्पादनावर परीणाम झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्यात यावे, अशी शेतकर्यांकडून मागणी होत आहे.
…..
..
दहा एकरवरील ज्वारी जमीनदोस्त
….
सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील दहा एकर ज्वारी जमीनदोस्त झाली. तर पाच एकरवरील गहू पिकावरही परीणाम झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरीत नुकसानभरपाई द्यावे.
योगिनाथ तोडकरी, शेतकरी, मंद्रुप
…..
द्राक्षे पिकावर परीणाम
…
सध्या द्राक्षे पिक काढणीला आली आहेत. चार एकरमधील द्राक्षेवर पावसाचे थेंब पडल्याने द्राक्षगळती होणार आहे. तसेच द्राक्षे कुजल्याने बागेत दुर्गंधी पसरणार आहे. वर्षभर सांभाळलेल्या द्राक्षेवर अवकाळी पाऊस पडल्याने वर्षभराचे उत्पन्न मिळणे मुश्किल बनले आहे.
जावीद शेख, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मंद्रूप
























