सोलापूर : सुलेरजवळगे जि .प .मराठी शाळेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेच्या पूजन प्रसंगी मुख्याध्यापक धोंडप्पा रुपनुरे त्यांनी भाषणात म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण देशभर त्यांची जंयती साजरी करताना प्रामुख्याने लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुता या तिन्ही तत्त्वांचे वारंवार स्मरण करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक धोंडप्पा रुपनुरे यांनी केले तसेच त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विषयक विचारावर प्रकाश टाकला आहे.
एक सामाजिक एकात्मतेच्या भावनेने राष्ट्रीय भावनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतका सखोल विचार केला आहे लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुता या तिन्ही तत्त्वांचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे असे बोलताना म्हणाले . लोकशाहीचे आधारस्तंभ:- स्वातंत्र्य समता आणि बंधुता ची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे .
संविधान निर्मिती:_ बाबासाहेबांनी अथक परिश्रमातून सर्वसामान्यांच्या हिताचे संविधान तयार केले. शिक्षण आणि समानता:- केवळ सामाजिक समानता पुरेशी नसून आर्थिक समानता आणि शिक्षण ही तितकेच महत्त्वाचे आहे . स्त्री सक्षमीकरण:- महिलांच्या 33% आरक्षण देण्याबाबत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहे . तब्बल दोन अडीच वर्षे अथक परिश्रम करून बाबासाहेबांनी लोकशाही संविधान तयार केले देशातल्या सामानातल्या सामान्य मानव माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आणि स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार मिळाले पाहिजे हा अधिकार स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तिन्ही गुणवैशिष्ट्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मिळू शकतो असे बाबासाहेबांनी सांगितले आहे त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.
समाजातील निरक्षरता दूर करून आर्थिक समानता प्राप्त झाल्याशिवाय या सामाजिक समतेला अथपूर्णता येणार नाही असे पुढे बोलताना म्हणाले . यावेळी वसंत भिसे ब्रम्हदेव राठोड दानिस्ता सय्यद प्रेमलता देशमुख विद्दार्थी विद्यार्थिनी पालक व इतर मान्यवर उपस्थित होते .
















