कुर्डूवाडी – भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मध्यवर्ती जयंती उत्सवाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डाॅ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी आमदार विनायकराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष बापुसाहेब जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन व धम्म वंदना घेण्यात आली. दिवसभर अभिवादन करण्यासाठी बौद्ध उपासक, उपासिका व मान्यवरांनी रांग लावली होती.
यावेळी नगराध्यक्षा जयश्री भिसे,उपनगराध्यक्षा सविता जगताप, नगरसेवक अमरकुमार माने,गटनेते समीर मुलाणी, शकील तांबोळी आनंद कदम,नितीन पवार, मोहसीन मकनू, हरिश्चंद्र कांबळे प्रा.आशिष रजपूत,वसीम मुलाणी, दर्शन काशीद अर्शाद मुलाणी,हरीश भराटे, चंद्रकांत वाघमारे, सचिन वाळके,जितेंद्र गायकवाड, भगवंत साळवे, प्रा.डाॅ.राजेंद्र दास,प्रकाश गोरे,जयश्री माने,सीमा रजपूत यांच्यासह असंख्य अनुयायी उपस्थित होते.
मध्यवर्ती महोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी रात्री 135 तोफांची सलामी देऊन जयंती उत्सवाला प्रारंभ केला. रोज सकाळी धम्म वंदना घेण्यात येणार आहे.
शहरात नगर परिषद कार्यालय, प्रांत कार्यालय,शाळा, महाविद्यालय,रेल्वे स्टेशन व कार्यालय,टिळक चौक,स्टेशन चौक पार्किंग, आंबेडकर नगर,पटेल चौक,भगवा झेंडा चौक, नवी काडादी चाळी समोर टेंभूर्णी रस्ता,माढा रोड आदी ठिकाणी मंडप उभारून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कुर्डूवाडी काँग्रेस अल्पसंख्यक सेलच्या वतीने महामानव विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातून रॅली काढण्यात आली होती. यामध्ये मोटार सायकल, रिक्षा, चारचाकी वरून तरूण, युवती, महिला व असंख्य भीमसैनीक हातात निळे झेंडे घेऊन जय भीम च्या घोषणा देत होते.
















