सोमवारी शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला .यात हकीकत अशी की संतोष मुरलीधर जाधव वय वर्षे ४७ हे नवीवेस उपविभाग सोलापूर शहर येथे कार्यरत आहेत.सोमवारी सकाळच्या सुमारास सरस्वती चौक ते रामलाल चौक या भागात लाईन देखभाल दुरुस्तीचे काम करत असताना लाईनमध्ये येणारी झाङांच्या फांद्या तोङत असताना सलिम शेख याच्यासह ईतर पाच ते सहा जणांनी मिळून झाङाच्या फांद्या का तोङतो या कारणावरुन संतोष जाधव यांना जबर मारहाण केली.
यात संतोष जाधव यांना चांगलीच दुखापत झाल्याने तात्काळ त्यांना यशोधरा हाॕस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.संतोष जाधव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना हाॕस्पिटमधील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
या घटनेने एकच खळबळ उङाली असून विद्युत वितरण विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येतेयं.संतोष जाधव यांच्या नाकाचे हाङ ही यात फ्रॕक्चर झाले आहे.या घटनेने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय,घटनेची माहिती कळताच जाधव,यांच्या कुटुंबियांनी व मिञ आप्तेष्टांनी यशोधरा हाॕस्पिटल याध्ये एकच गर्दी केली आहे.स्वतः विद्युत वितरण विभागातील अधिकारी यशोधरा मध्ये दाखल झाले असून उपचारात हलगर्जीपणा होऊ नये योग्य ते उपचार संतोष जाधव यांच्यावर केले जावेत यासाठी वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत.
तर संतोष जाधव यांना मारहाण करणारे सलिम शेख व त्याच्या ईतर पाच ते सहा मिञांवर गुन्हा दाखल व्हावा व त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी विद्युत वितरण विभागातील कर्मचाऱ्यांकङून केली जात आहे.दरम्यान फौजदार चावङी पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती संतोष जाधव यांच्या मिञांना K City News ला दिली.सरकारी कामात अङथळा निर्माण केल्याप्रकरणी सलिम शेख व त्याच्या मिञांना कठोर स्वरुपाचे कलम लावण्यात यावे अशी विनंती जाधव कुटुंबांकङून फौजदार चावङी पोलिसांना करण्यात आली आहे.