Google कंपनीने त्यांच्या Google I/O 2023 या भव्य कार्यक्रमात कितीतरी महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसंच गुगलचा पिक्सल ७ए, गुगल टॅब्लेट असे बरेच लेटेस्ट प्रोडक्ट्सही यावेळी लाँच केले गेले. कंपनीने एकूण तीन नवीन Pixel डिव्हाइसेस लाँच केले AI तंत्रज्ञानाविषयी नवनवीन घोषणा देखील यावेळी केल्या. या 2-तासांच्या इव्हेंटचे जवळजवळ पहिले दीड तास Google च्या AI योजनांबद्दल होते. कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये AI ला कसं सामावून घेत आहे, हे सारं यावेळी दिसून आलं. तसंच त्सयानंतर विविध लेटेस्ट उपकरणं कंपनीने यावेळी लाँच देखील केली. तर Google च्या 2023 च्या या Google I/O 2023 या सर्वात मोठ्या इव्हेंटमधील १० सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा कोणत्या ते पाहूया…
Google ने Pixel Fold या फोनसह फोल्डेबल कॅटेगरीतील आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला.तर या कार्यक्रमाचं हा मुख्य आकर्षण ठरला. Google च्या या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये हायएंड Pixel 7 Pro सारखीच Tensor G2 चिप आहे. डिझाईननुसार, ते 7.6-इंचाचा डिस्प्ले पुस्तकाप्रमाणे उघडतो आणि 5.8-इंचाचा बाह्य डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन आता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल आणि जूनमध्ये आल्यावर त्याची $1,799 (अंदाचे १,४८,००० रुपये) मध्ये विक्री होईल. Google ने भारतात Pixel Fold लाँच केलेला नाही.
Google ने Pixel 7A हा मिडरेंजमधील ए-सिरीज लाइनअपमधील गुगलचा फोन आहे.हा फोन पिक्सेल 7 प्रमाणेच Google च्या Tensor G2 चिपद्वारे समर्थित आहे. यात 6.1-इंचाचा 1080p डिस्प्ले आहे जो 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट देतो. तर एकीकडे हा एक चांगला मिड रेंज पर्याय असून या फोनमुळे याचाच जुना मॉडेल 6A ची किंमतही कमी झालेली आहे.
Google द्वारे तयार केलेला हा पहिला टॅबलेट असून हा Pixel टॅब्लेट ११ इंचाचा आहे. याची किंमत $499 (अंदाजे ४१,००० रुपये) अशी Pixel 7a च्या जवळपास आहे. या टॅबलेटमध्ये मॅग्नेट चार्जिंग दिल्यामुळे फोनचे फीचर्स आणखी सुधारले असून स्पीकर आणखी तगडे दिले आहेत. पिक्सेल टॅब्लेट हा Google द्वारे तयार केलेला पहिला टॅब्लेट असून गुगलच्या टॅब्लेटची पूर्वीची Nexus मालिका LG ने बनवली होती.
आता गुगलचं सर्ज इंजिन देखील AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने सक्षम आहे गुगल सर्चला जनरेटिव्ह AI सह एक प्रमुख अपडेट मिळत आहे, तेच तंत्रज्ञान जे ChatGPT ला शक्ती देते. यात AI स्नॅपशॉट नावाचे फीचर असेल ज्यामध्ये एकदा वापरकर्त्यांनी शोध जनरेटिव्ह एक्सपिरियन्स (SGE) नावाच्या नवीन फीचर्सची निवड केली की, तर त्यांना फोन देणारे सजेशन आणखी वाढणार आहेत.
Google ने घोषणा केली आहे की त्यांचा ChatGPT सारखा AI-शक्ती असणारा चॅटबॉट आता प्रत्येकासाठी उपलब्ध होत आहे. कंपनीने भारतासह १८० देशांमध्ये प्रतीक्षा यादी टाकली आहे. पण चॅटबॉट अद्याप बीटामध्ये आहे. Google अनेक नवीन फीचर्स देखील जोडत आहे, जसे की जपानी आणि कोरियन भाषांचा सपोर्ट Google डॉक्स अपडेट्स इत्यादी.