बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेता सुमीत पुसावळेनं नुकतंच लग्न केलं. सुमीतच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. कलर्स वाहिनीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभल मालिकेत बाळूमामांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेनं लग्न केलं आहे.दोघांनी पारंपरिक पद्धतीनं लग्नं केलं. सुमीत आणि त्यांची पत्नी मोनिका यांचा साखरपुडा प्रस्थान सोहळा देखील पार पडला. सुमीतनं साखरपुडा प्रस्थान सोहळ्यात मोनिकाला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. दोघांनी पारंपरिक वेशात मराठमोळ्या पद्धतीनं साग्रसंगीत लग्न केलं.अभिनेता सुमीतच्या हळदीला लागीर झालं जी मालिकेच्या सगळ्या टीमनं हजेरी लावली होती.पारंपरिक लग्नविधींनंतर पुढच्या विधींसाठी मोनिकानं घागरा चोळी तर सुमीतनं डिझाइनर कुडता पायजमा कॅरी केला होता.दोघांचा विवाह सोहळा जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.काही दिवसांआधीच सुमीतनं बायकोबरोबरचे फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची गुड न्यूज दिली होती.दोघांनी साऊथ इंडियन स्टाइलमध्ये हटके फोटोशूट देखील शेअर केलं होतं.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...