मोडनिंब (ता. माढा) येथील मुख्य रस्त्यावरील खड्ड्याबाबत तरुण भारत ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. खडीच्या साहाय्याने खड्डे भरून घेण्यात येत आहेत. सध्या मोडनिंब मध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या या मुख्य रस्त्यावर कायम वर्दळ असते. अपघाताना तोंड देत वाहन धारकांना खड्यातुन मार्ग काढत प्रवास करावा लागतो.परिणामी या खड्ड्यामुळे अनेकांना शारिरीक व्याधी निर्माण झाले आहेत. याच प्रमुख मार्गावर रुग्णालये, बँक, मेडिकल, एटीएम, कृषी विषयक दुकाने, हॉटेल आदी असल्याने नागरिकांची कायम वर्दळ असते.त्यामुळे वाहन धारकांना हाल सोसावे लागत आहेत. परिणामी या खड्यांमुळे अनेकांना शारीरिक व्याधी निर्माण झाल्या आहेत.जिल्ह्यातील क्रमांक दोनचा जनावरांचा बाजार व आठवडा बाजार मोडनिंब येथे भरतो.तसेच दळण वळणा साठी नजिकची अरण, शेटफळ, बावी, जाधववाडी, आष्टी, करकंब, सोलंकरवडी येथून लोकांची वर्दळ दररोज असते.आता मुख्य रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करून मोडनिंब करांच्या दुखण्यावर फुंकर मारल्याने मोडनिंबकर काही अशी सुखावला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...