केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा रविवारी (ता. ६) पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. केंद्रीय मंत्री शहा यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थांच्या पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...