ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकिंग करता सध्या सुरू असलेले www.mytadoba.org, https:ooking.mytadoba.org हे संकेतस्थळ तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे. दरम्यान आता जंगल सफारी बुकिंगसाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in हे राहणार आहे.
यापुढे सदर पोर्टलवरून कोणत्याही व्यक्ती वा संस्थेकडून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या हेतूने केली जाणारी बुकिंग वैध राहणार नाही. येत्या १७ ऑगस्ट २०२३ पासून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बुकिंगसाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in हे राहणार आहे. त्यामुळे ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे बुकिंग केवळ या पोर्टलवरूनच करण्यात यावे असे ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी स्पष्ट केले आहे.