पनवेलहून नांदेडकडे जाणारी प्रवाशी ट्रेन पुणे स्थानकात दीड तास प्रवाशांनी रोखून धरली. त्याचं कारण आहे झुरळं. रेल्वेच्या डब्यांमध्ये एवढी झुरळं आहेत की प्रवाशी अक्षरशः वैतागले आहेत.
त्याचं झालं असं की, पनवेल-नांदेड ट्रेन पनवेलहून निघाली खरी परंतु पुण्यातच अडकून पडली. पनवेल ते पुणे प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात झुरळांनी एवढा उच्छाद मांडला की डब्यात थांबणंही प्रवशांना शक्य नव्हतं.जेव्हा पनवेल-नांदेड ही ट्रेन पुणे स्थानकात दाखल झाली तेव्हा प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. झुरळांचा बंदोबस्त केल्याशिवाय ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...