महिला कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात मध्य रेल्वे नेहमीच अग्रेसर असते. सर्व महिला व्यवस्थापित स्थानक – मुंबई विभागातील माटुंगा स्थानक आणि त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक स्थापन करणारे भारतीय रेल्वेचे पहिले झोन असण्याचा मान आहे.
मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, भुसावळ विभागातील सर्व महिला व्यवस्थापित स्थानक म्हणून न्यू अमरावती स्थानक स्थापन करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील पहिले “पिंक स्टेशन” आणि संपूर्णपणे महिला कर्मचार्यांकडून व्यवस्थापित केले जाणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक आहे. या न्यू अमरावती स्थानकात 4 उप स्टेशन अधीक्षक, 4 पॉइंट वुमन, 3 रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि 1 स्टेशन तिकीट बुकिंग एजंट, 12 महिला कर्मचारी कर्मचारी संख्या आहे. स्टेशनवर दररोज अंदाजे 380 प्रवासी येतात आणि दररोज 10 ट्रेन चालतात/पास करतात.