केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज, शुक्रवारी 11ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता नागपुरातील हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ, नागपूर येथे संगीतमय लघुपट ‘आझादी’ लोकार्पण करण्यात येणार आहे.
‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या स्मरणार्थ हा लघुपट एसके म्युझिक वर्क्सद्वारे तयार करण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याशी संबंधित अनेक घटना या लघुपटामध्ये समाविष्ट असून समर्पक गीताचा त्याला साज चढवण्यात आला आहे. हे गाणे सिद्धार्थ कश्यप यांनी संगीतबद्ध केले असून प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. या गीताचे लेखन शकील आझमी यांनी लिहिले आहे. या संगीतमय देशभक्ती पर लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अंशुल विजयवर्गीय यांनी केले आहे. ‘आझादी’ लघुपटाची संपूर्ण टीम लॉन्च सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. हा संगीतमय लघुपट देशभक्तीपर संगीताच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल कारण यात खऱ्या भारतीयाच्या भावनेला चालना देणारे सर्व घटक समाविष्ट आहेत. स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास असलेले नागपूर हे भारताचे केंद्र असल्याने हा सोहळ्याला अधिक महत्व