Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत नामदेव स्मारकाचे लवकरच भूमिपूजन – अ‍ॅड.महेश ढवळे

तरुण भारतbyतरुण भारत
February 17, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर -तिर्थक्षेत्र पंढरी नगरीत चंद्रभागा नदीच्या तिरावर असणार्‍या ६५ एकर परिसरात उभारण्यात येणार्‍या बहुचर्चित व सुमारे १२ वर्षापासून प्रलंबित असलेल्या संत नामदेव महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली गतीमान झाल्या असून येत्या दोन महिन्यात स्मारक उभारणीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. महेश ढवळे यांनी दिली.


गुरुवार दि. १२ फेब्रुवारी शासकीय अधिकारी, आर्किटेक्ट यांच्या समवेत स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, शासकीय विभागाचे अधिकारी, श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज, मुकुंद महाराज, एकनाथ महाराज, भावार्थ महाराज, अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, नामदेव समाजोन्नती परिषदचे पदाधिकारी व शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना अ‍ॅड. महेश ढवळे म्हणाले, वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक, श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पंढरी नगरीत भव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी राज्य शासनाने 90 कोटी रुपये मंजूर केले. संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी चंद्रभागा नदीच्या पलीकडे भक्तीसागर येथे रेल्वे विभागाची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून याठिकाणी दहा एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत सोलापूर, पुणे व मुंबई येथे मंत्री, अधिकार्यांसमवेत अनेक बैठका पार पडल्या. याबाबत अनेक समस्या निर्माण होत होत्या. अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.


श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखीतळ मार्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडयाच्या अंतर्गत विभागीय आयुक्त, पुणे यांनी आराखड्यातील मंजूर कामांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पॅनल गठीत केला आहे. सदर पॅनलमध्ये पुणे येथील क्रिएशन इंजिनिअर कंपनीचा समावेश आहे. नियोजन विभागाच्या दि.१२ सप्टेंबर २०१४  च्या शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखीतळ-मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत संत नामदेव महाराज स्मारकाचे काम काम मंजूर आहे. सदर स्मारक उभारण्यासाठी या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


सदर स्मारकाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, न.पा. मुख्याधिकारी यांच्यासमवेत स्थळपाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेकरिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर यांच्याकडे सादर करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सदर पत्राच्या प्रती विभागीय आयुक्त, पुणे, विशेष कार्य अधिकारी (तीक्षेवि), उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, मुख्याधिकारी न. प. पंढरपूर यांना देण्यात आल्या आहेत.


सदर पाहणी दौर्‍याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांनी जागेसंदर्भात तर आर्किटेक्ट काळभैरव यांनी स्मारक उभारणीच्या कामाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष नंदकुमार कोसतवार, धनंजय गोंदकर, विश्वस्त, हर्ष कपडेकर, अनिल गचके, वर्धा, एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष व संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे पंढरपूर अध्यक्ष गणेश उंडाळे, सचिव विलास पोरे, विश्वस्त बाबासाहेब महिंद्रकर, राजेश धोकटे सर, अनिल निकते, पुरुषोत्तम निकते, राहुल महाडिक, जयवंत कांबळे, श्री संत नामदेव शिंपी समाजाचे युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट, दत्तात्रय चांडोले, अक्षय महिंद्रकर, आप्पासाहेब बंगाळे, भरत चांडोले, अनिल धट,गणेश महिंद्रकर, शिवकुमार भावलेकर, निलेश धोकटे, राजेंद्र निकते, दत्तात्रय निपाणकर, सतीश निपाणकर, संजय निपाणकर, सचिन बुरांडे, देविदास बोधे, रत्नाकर पिसे, संतोष पतंगे, प्रसाद निकते, कृष्णा चांडोले, माऊली निकते, प्रशांत काकडे, नाना जवंजाळ, बुलबुले, गणेश पतंगे, अक्षय जवंजाळ, कृष्णा जवंजाळ, गजानन खटावकर, गजानन जवंजाळ, सचिन केकडे,  नासपचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे, अशोक खैरनार, मुंबई, अक्षदा विवाह संस्थेचे संस्थापक, महेश मांढरे, नासपचे जेष्ठ विश्वस्त वसंतराव खुर्द, राजन उरणकर, नासपचे सांगली जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष बाळासाहेब काकडे कोषाध्यक्ष राजाभाऊ पोरे हडपसर विभाग उपाध्यक्ष अक्षय मांढरे, प्रमोद शिंपी, जळगाव, आर्किटेक्ट काळभैरव, पुणे कॅम्प अध्यक्ष प्रदीप खोले, महाराष्ट्र युवती अध्यक्षापूजा वादवणे, सहाय्यक वैभव सदावर्ते, पुणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सागर मांढरे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Post Views: 35
Previous Post

डॉ. सागर कांबळे यांची कॉस्मेटिक अँड टेकनॉलॉजी  अभ्यास मंडळावर निवड

Next Post

बेलीच्या महादेवा चरणी अंजली गायकवाड ज्योती गोराणे यांची स्वरपूजा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बेलीच्या महादेवा चरणी अंजली गायकवाड ज्योती गोराणे यांची स्वरपूजा

ताज्या बातम्या

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

सोलापूर जिल्हा ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स २ व ३ ऑगस्टला

July 27, 2026

अनुसूचित जातींच्या आरक्षणात हस्तक्षेप खपवून घेणार नाही : आनंदराज आंबेडकर

July 27, 2026
ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

July 27, 2026

आषाढी यात्रेच्या काळात तात्काळ उपचारामुळे हृदयविकाराच्या झटका आलेल्या ६ वारकऱ्याना मिळाले जीवनदान

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1005317

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!