ओडिएफ प्लस गाव करण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे वेळेत पुर्ण करा. जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा. जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई केलेस काळ्या यादीत टाकू अशा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिला.
तांत्रिक सहाय्य करणारी पीएमसी संस्थेस कामात दिरंगाई केल्याबद्दल कारणे दाखवा नोटिस देऊन मानधन रोखण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जल जीवन मिशन ते प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक डाॅ. संजय कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य, बीआरसी व सीआरसी, आयएसए, पीएमसी, टीयूव्ही या सल्लागार संस्थेचे समन्वयक व कर्मचारी उपस्थित होते.