शहरातील मोमीनपुरा भागामध्ये एनआयएने छापा टाकून पीएफआय नेत्याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मालेगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नया इस्लामपूर भागातील मोमीनपुरा येथे अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. या ठिकाणी घर नंबर 34 मध्ये राहणारा गुरफान खान सुभान खान या (33) पीएफआयच्या नेत्याला अटक करण्यात आली.
मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या दहशतवादी नेत्याकडून अजून काही माहिती समोर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मालेगाव हे दहशतवादी कारवाया करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र बनले आहे. यापूर्वी देखील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते.