पंढरपूरमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली तसेच विविध मान्यवरांची मनोगतं झाली.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात बहुसंख्येने आदिवासी बांधव आहेत. या आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, निश्चितच येत्या काळात आमच्या लढ्याला यश मिळेल. यासाठी आपली एकजुट कायम असावी. आपल्या न्याय हक्क्कासाठी लढतो तोच समाज सुखी आणि विकसाभुमख आयुष्य जगु शकतो, शिक्षण, संघटीत राहणं आणि संघर्ष करणं चालु ठेवुया आणि आज जागतिक आदिवासी दिनादिवशी याबाबतचा संकल्प करुया. सर्व समाज बांधवांना जागतीक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा! असे मनोगत यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.
यावेळी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायमशाळा, वाल्मिकी भवन, आदिवासी भवन, आपटे उपलप प्रशाला, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे रुग्णालय (सामान्य (कॉटेज) रुग्णालय), दिनदयाळ कोळी वाडा, व चंद्रभागेतील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकावर आदिवासी दिनानिमित्त दिवसभर आदिवासी समाज बांधवांनी येऊन अभिवादन केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.