सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील जवळपास २७१ पोलिस नाईक व सहायक पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पदोन्नतीचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. तर शहर पोलिस दलातील २४ जणांना देखील पदोन्नती मिळणार आहे. ‘डीपीसी’ची (डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी) बैठक झाल्यानंतर शहरातील राहिलेल्या अंमलदारांची पदोन्नती होईल. पण, ग्रामीणमधील अंमलदारांना १५ ऑगस्टपासून नेमणूक मिळेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने एकीकडे पोलिस अधिकाऱ्यांची गरज भागणार आहे.