सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अग्रगण्य अशा लोकप्रिय दैनिक सोलापूर तरुण भारत आणि वृत्तवेध न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी प्रशांत माने यांची सोलापूर तरुण भारत मीडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांचे कडून नियुक्ती करण्यात आली.
प्रशांत माने यांनी पत्रकार क्षेत्रातील आपली सुरुवात 1995 साली दैनिक सोलापूर तरुण भारत मधूनच केली होती. त्यानंतर दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी आदी विविध दैनिकातून प्रशांत माने यांची आजपर्यंतची वृत्तपत्र क्षेत्रातील कारकीर्द आहे. तरुण भारत मिडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे, संचालक प्रशांत बडवे, संचालक चेतन्य पेठे, यांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. श्रीनिवास, व्यवस्थापक विनायक पुला, मराठवाडा विभाग प्रमुख राजाराम मस्के, जाहिरात विभाग प्रमुख मनोहर बायनी, प्रिसिजन प्रिंट्सचे व्यवस्थापक महेश दिड्डी, व्यवस्थापक नागसेन शिवशरण वृत्तवेध न्यूज चैनल चे व्हिडिओ एडिटर दिलावर शेख, अभिजीत पेटकर, आप्पा शहाबादे आदीसह सर्व प्रमुख, सहकारी उपस्थित होते.