जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर येथे शैक्षणिक प्रकरणांचे त्रुर्टी पुर्तता करण्यासाठी दि.17 व 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 ते सांय. 5.00 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव सचिन कवले यांनी दिली.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विदयार्थ्याना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याने सर्व विदयार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, सन 2023-24 या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणा-या ज्या विदयार्थ्यांनी अदयाप जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. ज्यांचे प्रकरण त्रुर्टी मध्ये आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत त्रुर्टी ची पुर्तता करावी.ज्या अर्जदारांचे प्रकरण सध्यस्थितीत त्रुर्टी मध्ये आहे अशा सर्व अर्जदार यांनी दि. 17 व 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 ते सांय. 5.00 वाजेपर्यंत या वेळेत प्रस्तावासोबत जोडलेले सर्व मुळ कागदपत्रे, मानीव दिनांका पूर्वीचे जात नोंद पुरावे, अर्जदार यांच्या प्रस्तावाला कोणती त्रुर्टी आहे याबात इमेल व भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात आले आहे. तरी अर्जदार यांनी आपले ईमेल तपासून आपल्याला जो इमेल आला आहे. त्याची त्रुर्टी पुर्तता शिबीरामध्ये करावी जेणेकरुन जात वैधता प्रमाणपत्रा अभावी अॅडमीशनपुर्वी कोणीही अर्जदार वंचीत राहणार नाही याची नोंद सर्व अर्जदार, पालक यांनी घ्यावी. अर्जदार यांनी त्रुटींची पुर्तता वेळेत सादर न केल्यास आपला अर्ज त्रुर्टी पुर्तता सादर न केल्याने निकाली काढण्यात येईल.असेही संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव कवले यांनी पत्रान्वये कळविले आहे.