भंडारा जिल्हातील माटोरा येथे उपसा सिंचन कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. हे पाणी शेतात शिरल्याने सुमारे 15 हेक्टर धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वेळीच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्हातील बहुतांश भागात कालवा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी हे काम पूर्णत्वास आले आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिकाकरिता सिंचनाचा पाणी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने उदान्त हेतूने हा प्रकल्प राबविला मात्र शेतकऱ्यांना उन्हाळ्यात धान पिकाला पाणी दिला जात. तर पावसाळ्यात योग्य ती उपाय योजना न केल्यामुळे कुठे पूरपरिस्थिती निर्माण होते तर काही भागात कालवा फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. असा एक प्रकार भंडारा तालुक्यातील माटोरा येथे पाहायला मिळाला आहे. येथे उपसा सिंचनाचे काम पूर्ण झाले मात्र कंत्राटदराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे जेव्हा जेव्हा पाणी सोडले जाते तेव्हा कालवा फुटत आहे. याची तक्रारसुद्धा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.