राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या ९ गुन्ह्यात ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही गुळवंची तांडा, ति-हे तांडा व वांगी नंबर १ येथील तांड्यावर कारवाई केली.ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या पथकांनी सकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे तांडा व गुळवंची तांड्यातील हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवर छापे टाकले.
या छाप्यात सुनिता सिद्राम चव्हाण (वय ४५) या महिलेच्या ताब्यातून चार हजार तिनशे किंमतीची ८० लिटर हातभट्टी दारु जप्त करुन गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग व तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी पार पाडली. गुळवंची तांडा (ता. उत्तर सोलापूर) परिसरात हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकून सहा गुन्हे नोंदविले.