गेली अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असून या योजनेच्या मंजुरी संदर्भात 5 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात माहिती आ. समाधान आवताडे दिली.
2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तालुक्याच्या दक्षिण भागातील 35 गावाच्या पाणी प्रश्नावरून राजकीय रणकंदन झाले. त्यानंतर 2014 ला या योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली. पाणी उपलब्धता व गावे कमी करण्यावरून 2019 ची विधानसभा निवडणूक गाजली.महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेचे सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात आले. परंतु योजना प्रत्यक्षात काही मार्गी लागली नाही.