जिल्ह्यातील कांदा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून सोमवारी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कांद्याची खरेदी आणि विक्री होऊ शकली नाही.
केंद्र सरकारने कांद्याच्या किमतीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात काढण्यासाठी 40 टक्के जास्त निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटु लागले असून शेतकरी यासाठी रस्त्यावरती उतरले आहेत नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे माहेरघर असलेल्या जिल्ह्यामध्ये रविवारी सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर या आंदोलनाची धग सोमवारी देखील सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आक्रोश या निमित्ताने समोर आला आहे.
दरम्यान दुसरीकडे होता केंद्र सरकारच्या या निर्णयाला कांदा विक्री करणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांचा देखील विरोध समोर येऊ लागला आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील उमराणे येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली . या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आणि जिल्ह्यातील होलसेल कांदा व्यापाऱ्यांची बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. निर्णयाप्रमाणे सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा होलसेल व्यापारी यांनी आपले दुकाने बंद ठेवली. यामुळे कोणत्याही प्रकारची कांदा खरेदी विक्री सोमवारी झाली नाही.