कुर्डूवाडी – चार लाख पंच्याहत्तर हजार एकशे नऊ रूपये शिलकीचा, कोणतीही करवाढ नसलेला पण स्वच्छता व आरोग्यसाठी पाच कोटी त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार आठशे रूपये एवढी भरीव तरतूद असणारा सन 26 / 27 या वर्षासाठी नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी आज कुर्डूवाडी नगरपालिकेच्या के.एन.भिसे सभाग्रहात अर्थसकल्प माडला. बजेटची मिटींग असताना विरोधकाकडून मात्र विषय भरकटत नेहण्याचा प्रयत्न करून जूनेच पण तेही राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारे विषय पुढे केले जात होते.त्यावर बजेटवर बोला, बजेटवर बोला असे नगराध्यक्षांनी सुनावले.
@ कुर्डूवाडी नगरपालिकेेत के.एन.भिसे सभाग्रहात आज नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा सविता जगताप,मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या उपस्थीतीत सन 2025— 2026 चा सुधारीत अर्थसंकल्पीय अंदाज व सन 2026 -2027 अर्थसकल्पीय अंदाज मुख्याधिकारी यांनी तयार केला नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी पध्दतशीरपणे माडून मंजूर करून घेतला.
@ अर्थसकल्प मांत असताना माजी नगराध्यक्ष गटनेते समिर मुलाणी यांनी महात्मा फुले शाँपिंग सेंटरचे तसेच पं.स.समोरचे जब्बारशेठ मुलाणी शाँपिंग सेंटरचे गाळे का बद आहेत असा जाब विचारला वास्तविक पाहता मुलाणी यांचा विषय प्रश्न योग्यच होता कारण ते गाळे पाच ते पंधरा वर्ष झाले पडून आहेत त्या -त्या वेळच्या नगराध्यक्षांनी यावर तोडगा काडणे गरजेचे होते पण ते झाले नाही.तोच प्रश्न सभाग्रहात मुलाणी यांनी लावून धरला.यावर कार्यालयीन अधिक्षक बापू चोभे यांनी तो विषय अधिकचे डीपाँझीट व भाडे यामुळे निर्माण झाला असून राज्यसरकारच्या अखत्यारीत विषय येतो तरीही आपण त्रिस्तरीय समितीपुढे ठेवून तोडगा काडण्याचा प्रयत्न करू असे सांगीतले. या गाळ्यापोटी न.पा.केस मिळणारे पाच वर्षात तीन कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे. यावेळी मुलाणी यांनी नगरसेवकांना वार्डातील कामे करण्यासाठी तांत्रीक फंडाची रक्कम वाढवण्याचीही मागणी केली. काल झालेल्या नगरपालीकेतील भांडणात बिले काढण्यासाठी खटके या कर्मचा-याला शिवीगाळी करण्यात आली याचा निषेध मुलाणी यांनी सभाग्रहात केला. मात्र मुलाणी यांच्या प्रत्येक प्रश्नावर सत्ताधारी एकाही नगरसेवकासह नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनीही उत्तर देणे महत्वाचे महत्वाचे समजले नाही.
@ नगरसेवक अमर माने यांनी मुख्याधिकारी तपसे रेग्यूलर येत नाहीत,फाईली पाहत नाहीत त्यामुळे सह्यांची अडचण येते खद्द कर अधिकारी यांनी भर सभाग्रहात मुख्याधिकारी आले नसल्याने सह्या झाल्या नसल्याचे सांगीतले.तर एक नळ कनेक्शन असताना दोन कनेक्शनचे बील दीले जाते अशी खंत आरोग्य समिती सभापती मोहसिन मकनू यांनी खंत व्यक्त केली.
@ सर्वात महत्वाचा मुध्दा नगरसेविका वृशाली गांधी यांनी मांडला.रेल्वे व पं.स.कडून नगरपालिकेस 85 लाख रू.पाणीपट्टी येते. बार्शी नगरपालिका पाईपलाईनचा देखभाल दुरूस्ती पाहते जर रेल्वे प्रशासन स्वतासाठी पर्याय तयार करणार आहे आणी बार्शी न.पा.स्वतंत्र पाईपलाईन करत आहे तर पुढे प्रश्न गंभिर आहे आपले काय पर्याय आहेत या प्रश्नावर मात्र अधिका-याकडे समावेशक उत्तर नव्हते. नागरीकांच्या थकीत शास्ती कर रध्द करण्यात यावे अशी मागणी आर.पी.आयचे चद्रकांत वाघमारे यांनी पत्राद्वारे केली होती. याचाही विचार करून दोन टक्के शास्ती कर भरून घेतला जाणार नसल्याचे नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी सांगीतले.
@ सर्वात शेवटी उपनगराध्यक्षा सविता जगताप यांनी आपण शहर स्वच्छ करण्यास निघालो आहोत मात्र अगोदर पालिका स्वच्छ करावी शहरात महीलांठी स्वच्छतागह उभा करावीत असे सांगीतले.
यावेळी सर्व आरोग्य समिती सभापती मेहसिन मकनू यांच्यासह सर्व समिती सभापती, , नगरसेवक धनंजय डिकोळे, शकीलभाई तंबोळी, वृशाली गांधी, अंजली गावडे,अबोली चौधरी,रेश्मा गोरे यासह सर्व अधिकारी ,कर्मचारी उपस्थीत होते.
@ नगरपालिकेस येणारे उत्पंन्न खालीलप्रमाणे
प्रारंभिक शिल्लक— 145668429/-
न.पा.दर व कर— 44909000/-
विशेष अधिनियमाखाली वसुली— 84022001/-
मालमत्ता व उपयेगीता सेवा प्राप्त महसूल व कर आकारणी व्यतीरीक्त उत्पन्न – 10506000/-
इतर संकीर्ण -86666000/-
प्राप्त व अंशता अनूदाने— 524300000/-
एकूण रक्कम— 820451431/-
@ होणारा खर्च—
सामान्य प्रशासन व कर वसूली— 111791680/-
सार्वजनिक सुरक्षीतता— 9055000/-
सार्जनिक आरोग्य सोई व सुविधा— 55341800/-
शिक्षण— 410000/-
ईतर संकीर्ण— 27127341/-
खर्च अनूदाने व अंशदाने— 616250500/-
एकूण रक्कम— 819976321/-
@ चौकट—
बजेटच्या मिटींगला मुख्याधीकारी आर्धा तास उशीरा पोहोचले.
कुर्डूवाडी शहरासाठी महत्वाचे धोरण ठरवणा-या महत्वाच्या बजेटच्या मिटींगमध्ये मुख्याधीकारी सचिन तपसे हे तब्बल बत्तीस मिनीटे उशीरा आले. नगराध्यक्षा जयश्री भिसे,उपनगराध्यक्षा सविता जगताप, सर्व विभागाचे सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व विभागाचे विभागप्रमुख,अधिकारी तब्बल बत्तीस मिनीटे उशीरा आलेल्या मुख्याधिकारी सचिन तपसे यांची मिटींगची तयारी पुर्ण होवूनही वाट पाहत बसले होते.शेवटी 11:32 वा मुख्याधिकारी आले आणी त्यांनी मिटींग चालु करण्याच्या सुचना केल्या. बजेट मांडत असताना माजी उपनगराध्यक्ष गटनेते समिर मुलाणी यांनी शहरातील शाँपिगसेंटरच्या पडून राहीलेल्या गाळ्यासंदर्भासह ईतरही अनेक विषयावर प्रश्न उपस्थीत केले मात्र त्यांच्या प्रश्नावर नगराध्यक्षासह एकाही सत्ताधारी नगरसेवकांनी उत्तर देणे उचीत समजले नाही.

























