व्हॉट्सऍप वरुन ओळख झालेल्या मित्राने दोघांचे फोटो आई-वडिलांना दाखवतो, असे सांगून अल्पवयीन मुलीवर वारंवार दुष्कर्म केल्याची घटना पडली आहे. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन कौलगी याच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित मुलगी बारावीमध्ये शिकत असताना ती कोचिंग क्लासेसला जात होती. कोचिंग क्लासेसच्या बाहेर आरोपी सचिन हा अधूनमधून येत होता. एके दिवशी त्याने तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज केला. त्यावेळी त्याला तिने रिप्लाय दिला. त्यानंतर दोघांचे व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरु होऊन दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ते दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते. २०२३ मध्ये सचिनने तिला फोनकरुन तिला कॅफेमध्ये नेले. कॉपी पिल्यानंतर दोघांनी फोटो काढले होते. थोड्या दिवसांनी त्याने ते फोटो पीडितेच्या आई- वडिलांना दाखवतो अशी धमकी दिली. तिने त्याला भीतीपोटी ते फोटो घरच्यांना दाखवू नको असे सांगितले असता त्याने मी जे सांगेल ते ऐक अशी धमकी दिली. कॉलेज सुटल्यानंतर तो कॉलेजच्या गेटवर दुचाकी घेऊन आला. त्याने तिला कॅफे हाऊसमध्ये नेले व धमकी देऊन तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर सात ते आठवेळा तिच्यावर दुष्कर्म केले, तो व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये काढला होता. ते फोटो आणि दोघांमधील शरीर संबंधाचा व्हिडिओ पीडीतेच्या भावाने पाहिला. तेव्हा तिने सर्व हकीगत सांगितली. आई-वडिलांनी धीर देऊन आरोपीविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!
तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...