सोलापूर – फायनान्स कंपनीमध्ये काम करीत असताना ऑफिसमधील गैरव्यवहार उजेडात आणलेल्या महिलेचा मानसिक त्रास देऊन विनयभंग करणाऱ्या दहा जणाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ली, किरण कुमार कापसे, दीपक पोगुल,सिद्धलिंग नवले, रतिकांत बामणी, भीमाशंकर बिराजदार, बसवराज पाटील, मार्कंडेय ताटी पामोल सर्व राहणार सोलापूर गौतम नायक कणकट्टे, संजय भाटिया, राहणार मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील पीडिता ही दाजी पेठेतील जमखंडी ब्रिज जवळ असलेल्या किस्त फायनान्स या कंपनीमध्ये काम करीत होती पिढीतेने फायनान्स ऑफिस मध्ये चालत असलेले गैरव्यवहार उजेडात आणले असल्याने तिला ऑफिसमध्ये काम करणारे ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ली किरण कुमार कापसे दीपक सिद्धलिंग नवले यांनी जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचा विनयभंग करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले तसेच रतिकांत बामणी भीमाशंकर बिराजदार बसवराज पाटील यांनी पिढीतेला ऑफिसमध्ये सांगेल ते काम कर नाहीतर मुंबई ऑफिस मध्ये खोट्या तक्रारी करून कामावरून कमी करायला सांगू असे म्हणून वारंवार मानसिक त्रास दिला त्याचप्रमाणे एरिया क्रेडिट मॅनेजर मार्कंडेय ताटी पाहून याने पीडितेची तिच्या नातेवाईकांमध्ये बदनामी केली कंपनीचा एच आर गौतम नायकनकट्टे लीगल हेड संजय भाटिया यांनी पीडितेने केलेल्या तक्रारीबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता तू आमच्या फायनान्स कंपनीत काम करू नको तू रिझाईन दे तू कॅरेक्टरलेस आहेस असे बोलून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिची बदनामी केली म्हणून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिस्टे पुढील तपास करीत आहेत
 
	    	 
                                
















 
                