Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगराध्यक्ष पदाची सूत्रे हातामध्ये घेताच जात पडताळणी विभागाकडे तक्रार दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिद्धी राजू वस्त्रे या निवडून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हातामध्ये घेतली असतानाच त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला आहे याबाबत सोमेश क्षीरसागर यांनी जात पडताळणी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे .

    शीतल सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ नगर परिषदेची  नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती . यामध्ये त्यांचा पराभव झाला होता . थेट नगराध्यक्ष पदी निवडून आलेल्या सिद्धी राजू वस्त्रे यांची जात ही हिंदू बेडा जंगम नसून त्या फक्त हिंदू जंगम आहेत असे तक्रारदार सोमेश  क्षीसागर यांचे मत आहे . याबाबत सिद्धी वस्त्रे यांचे वडील राजू  विश्वनाथ  वस्त्रे यांचा शाळेचा दाखला जोडण्यात आलेला आहे .राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा शाळेचा दाखला हा १९६९ सालातील आहे . सिद्धी वस्त्रे यांचा शाळेचा दाखला हा २००३ सालातील आहे . सिद्धी वस्त्रे यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा १० १०. १९७८ रोजीचा विनाक्रमांकचा जातीचा दाखला जोडण्यात आलेला आहे . त्याचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणतेही कागदपत्रे रेकॉर्ड जोडली नाहीत कोणती जात वडीलाकडून मुलांना प्राप्त होत असते त्या अनुषंगाने सर्वात जुना पुरावा हा त्यांचा सिद्ध करण्यासाठी उपयोग होणे आवश्यक असते . सिद्धी वस्त्रे यांचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे ही सुशिक्षितच होते . त्यांनी हयात असताना त्यांनी पत्रकारिता केली आहे .त्यांचा जन्म १९२८ सालातील असून त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला यावर जातीचा उल्लेख हा हिंदू जंगम असा करण्यात आलेला आहे . तर त्यांचा मुलगा राजू वस्त्रे याच्या शाळेच्या दाखल्यावर बेडा जंगम चा उल्लेख आलेला आहे . तोच मुळात बेकायदेशीर आहे . त्याचप्रमाणे  त्यांची मुलगी सिद्धी वस्त्रे यांच्या रेकॉर्डवर देखील हिंदू  बेडा जंगम अशी नोंद आलेली असून ती ही बेकायदेशीर आहे असे तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांचे म्हणणे आहे . 

   सिद्धी राजू वस्त्रे यांचा वडिलांचा किंवा आजोबाचा कोणत्याही प्रकारे जातीचा दाखला वैध झालेला नाही . त्यामुळे बेडा जंगम असा उल्लेख असला तरी ते बेडा जंगम होऊ शकत नाहीत . निवडणूक अधिकाऱ्यांची शिफारस घेऊन जीआर सादर केलेला आहे . त्यामध्ये वंशावळचे प्रमाणपत्र दिलेले आहे .त्यात सिद्धी वस्त्रे यांचे चुलते दीपक गोपीनाथ वस्त्रे  यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे . परंतु त्यांनी जातीय प्रमाणपत्र ही जोडलेले आहे  दीपक वस्त्रे यांचा जातीचा दाखला हा २९./७/२०१३ रोजी सादर केलेला असून २२/८/२०१३ रोजी त्यावर न्याय निर्णय झाल्याचे देखील दिसून येईल.  दीपक  विश्वनाथ वस्त्रे यांना कोणत्याही दक्षता पथकाशिवाय किंवा कोणत्याही चौकशी शिवाय तोच पुराव्यावर जात वैधता प्रमाणपत्र अदा करण्यात आलेले आहे . त्यामुळे त्यांनी समितीची दिशाभूल करत स्वतःच्या चुलत्याच्या जात वैधता प्रमाणपत्रावरून स्वतःचे वैधता प्रमाणपत्र मागण्यासाठी घाई करण्याची दाट शक्यता आहे असेही सोमेश क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे . सिद्धी वस्त्रे यांचे चुलते दीपक विश्वनाथ वस्त्रे यांचा मुलगा दिग्विजय आणि किशोर दीपक वस्त्रे यांचेकडे हिंदू जंगम जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आहे . त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील हिंदू जंगम जातीची जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र स्वीकारलेली असून त्याचा लाभ देखील घेतलेला आहे . त्यामुळे त्यांना अनुसूचित जातीचा लाभ घेता येणार नाही .  सिद्धी राजू वस्त्रे यांचे कुटुंब ही हिंदू जंगम समाजाचे असून ते वीरभद्रेश्वरांचे मानकरी पुजारी आहेत . वीरभद्रेश्वर हे लिंगायत समाजातील उच्चवर्णियांचे कुलदैवत असून त्यांच्या लग्न समारंभामध्ये जंगम स्वामी कडून लग्न लावली जातात . सध्या त्यांचे कुटंब वीरभद्रेश्वर मंदिराच्या लगतच राहतात .त्यामुळे  त्यांचे कुटुंबीय बेडा जंगम असू शकत नाही असे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे .

  बेडा जंगम जातीच्या व्यक्ती अनुसूचित जातीच्या लोकवस्तीमध्ये वास्तव्यास असून अनुसूचित जातीतील लोकांची दहनविधी करणे, मढी ओढणे ही बेडा जंगम जातीची प्रमुख कामे आहेत. परंतु वस्त्रे कुटुंब हे वीरभद्रेश्वरांचे मानकरी आहेत . बेडा जंगम अजिबात नाही फक्त वडिलांच्या शालेय नोंदणीमध्ये मिळणारी असल्याचा गैरफायदा घेऊन बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र काढलेले होते .  ते वैद्यकरणासाठी सादर करण्यात आलेले आहे 

  वस्त्रे कुटुंब हे हिंदू जंगम असून त्यांनी हिंदू बेडा जंगम या जातीचा दाखला पूर्णपणे चुकीच्या कागदपत्रावर मिळवलेला आहे . त्यांच्याकडे बेडा जंगम असल्याचा कोणताही कागदपत्रे पुरावा नाही . त्यांची संपूर्ण मदार ही त्यांचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे यांच्या दाखल्यावर होती .विश्वनाथ वस्त्रे यांचा १९२८ चा शालेय नोंदणीचा दाखला त्यामध्ये स्पष्टपणे हिंदू जंगम अशी नोंद आहे . त्यामुळे सर्वात शेवटचा संविधान पूर्वकाळातील महत्त्वाचा शालेय रेकॉर्ड  पडताळले असता वस्त्रे यांची जात ही हिंदु जंगम असल्याचे सिद्ध होते त्यामुळे त्यांचा बेडा जंगम दाखल हा अवैध करणे न्यायाचे व गरजेचे आहे .

त्यामुळे सोमेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार नूतननगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांचा दाखला रद्द होणार का ?याची चर्चा सुरू झाली आहे .क्षीरसागर यांच्या या तक्रारीमुळे सिद्धी वस्त्रे यांना पहिल्याच घासाला मीठाचा खडा लागल्याची चर्चा मात्र मोहोळ मध्ये चवीने सुरू झाली आहे .

Post Views: 26
Previous Post

राज्यस्तरीय पुरस्काराने मारुती बेलभंडारे सन्मानित

Next Post

महापालिका निवडणुकीत खर्चावर कडक नजर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिका निवडणुकीत खर्चावर कडक नजर

ताज्या बातम्या

हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमुळे सोलापूरच्या विकासालाही मिळणार गती#aajsolapur #viral #public #news

February 1, 2026

रस्त्यावर अपघातप्रवण चार ठिकाणी गतीरोधक बसवले; नगराध्यक्ष दोसानी यांचे आभार

February 1, 2026

पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या सरपंच व अधिकारी यांचें विष्णुपुरी येथे स्वागत

February 1, 2026

पांगरगावचा शिध्दोधन शिंदे केंद्रीय राखीव पोलीस दलात

February 1, 2026

कंधार येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कार्यकारिणी जाहीर

February 1, 2026

होटाळा जि प शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चालिकवार यांचे राज्यस्तरीय शब्दकोडे स्पर्धेत दैदीप्यमान सुयश

February 1, 2026

आ. बोंढारकर यांच्या संकल्पनेतून गोदावरी जलपूजन आणि शुद्धीकरण अभियानास प्रारंभ

February 1, 2026

स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी धनाजी जोशी यांचे निवेदन

February 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0652455

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697