अक्कलकोट – या पृथ्वीवर मानव सारखं पशु, पक्षी, प्राणी, कीटक सह लाखो जीव जतू वावरत आहेत. मात्र निसर्ग या सर्वांना कोणताही भेद भाव न करता समान वागणूक देत आहे. यामुळे मानव धर्माचा जय असो म्हणण्यापेक्षा निसर्ग धर्माचा जय असो असे जयजयकार करण्यांचा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समितीचे नवी दिल्ली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज यांनी दिले.
तालुक्यातील मैंदर्गी येथील श्री क्षेत्र सिध्दाश्रम विरक्त मठ येथे प.पु म.नी प्र बसवलिंग महास्वामिजी वीरक्त मठ अक्कलकोट यांच्या सानिध्यात तसेच मैंदर्गी येथील सिध्दारूढ वीरक्त मठाचे मठाधीपती प. पु. मृतंजय महाराज यांच्या नेतृत्वखाली२४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान प.पु. श्री ष ब्र. चिदानानंद भारती महास्वामीजी सिध्दारूढ मठ, चिक्कोडी जिल्हा, बेळगाव यांच्या रसाळ वणीने रोज सायंकाळी श्री सिध्दारूढ महात्मे या विषयावर पुराण कार्यक्रम सुरु आहे.मादन हिप्परगा येथील शांतमल्लाप्पा बट्टरकी व बसवराज गुरुपादप्पा बुट्टरकी यांचा गायनाचा आणि श्री. वीरेश एम. सोन्नाडा यांचा तबला वाद्याचा साथ त्यांना लाभला आहे. या प्रसंगी राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज यांचा मैंदर्गी गावातून एका रथा विविध वाद्य समवेत फटाकाचे आतेश बाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील जमेलला सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन दिव्य संदेश दिले.या दिव्य संदेशात पुढे म्हणाले कि, आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले आहे. सहजा सहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही. आता आपल्याला स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्याचे रक्षण करण्यासाठी बलिदानाची गरज नाही. योग्य व्यक्तीस मतदान देऊन संविधान व देश वाचवा.राजकारणामध्ये धर्म असावे मात्र धर्मामध्ये राजकारण नसावे तसेच झाकून खाण्यापेक्षा वाटून खाल्लेली सर्व श्रेष्ठ असल्यांची संदेश यावेळी दिले. या प्रसंगी पूज्य घनलिंग स्वामीजी निरीलकिरी,पूज्य सिधलिंग देवारू मठ नागणसूर महास्वामीजी प. पु. सिद्धलिंग देवरु बिजापुर,अँड बसवराज सलगर सह आदीजण उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणप्पा बिज्जरगी यांनी केले तर आभार
चौकट
देश सेवा हेच इश सेवा आहे. कोणीही जात, पात,धर्म,पक्ष यांच्या आधारावर लढू नये. आज प्रत्येकासाठी देश आणि राष्ट्रधर्म हा सर्वोच्च असला पाहिजे. सर्व धर्मांमध्ये समानता असली पाहिजे. देशाला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी सर्व भारतीयांनी एकरूप व्हावे, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. सर्वांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन देशाच्या भल्यासाठी झटले पाहिजे
– राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज
राष्ट्रीय अध्यक्ष
जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली
चौकट २
राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज स्वत:ला कोणत्याही मठापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण देश आपली मठ आहे असे समजून देश बळकट करण्याचे काम ते सतत करीत आहे. देशांची एकात्मता मजबूत होण्यासाठी संविधानिक कर्तव्याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकांना करून देण्यासाठी नेहमी देशभक्ती कार्यक्रमाची आयोजित करीत असतात.ते देशभर फिरून सशक्त देश व समाज घडविण्याचे काम करत आहेत.एक संन्याशी हवा मल्लिनाथ महाराज जय भारत माता सेवा समितीची स्थापना करून हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत देशात देश भक्ती निर्माण करणारे हे दुर्मिळ देशभक्त राष्ट्रीय संत आहेत.
– प.पु म.नी प्र बसवलिंग महास्वामिजी
वीरक्त मठ अक्कलकोट


















