उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघाचे विकास कार्यसम्राट लोकप्रिय आमदार राजेश पवार आणि जि . प सदस्या पुनमताई यांचे संकल्पना होती की उमरी मोंढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळा उभारावा ते आज थोडया दिवसात कृतीत उतरणार असून भव्यदिव्य असा छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे .
आ राजेश पवार म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे सरसंंस्थापक, आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५१ वे पावन वर्ष! छत्रपतींचे कार्य चंद्र-सूर्य असेपर्यंत आपल्या कित्येक पिढ्यांसाठी ऊर्जादायी, स्फूर्तीदायी असणार आहे. माझ्या नायगाव मतदारसंघातील युवकांना, नागरिकांना जाणते राजे छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श असावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक व्यक्तीने घ्यावेत यासाठी उमरी शहराच्या मोंढा चौकात शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याची माझी मनीची इच्छा आता मूर्तरुप धारण करत आहे. माझ्यासाठी निश्चितच हा जगावेगळा आनंद आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शिल्पकार सुनील देवरे यांनी दिल्ली येथे बनवलेला छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा हा लवकरच उमरी येथील मोंढा चौकात दिमाखाने उभारला जाणार आहे. न्यू जय भारत शिक्षण प्रसारक मंडळ, आलुवडगाव ता. नायगाव संस्थेच्या वतीने यासाठी लागणारा संपूर्ण खर्च दिला जाणार आहे.
पुतळ्याचे काम आता पूर्ण झाले असून त्याच्या पाहणीसाठी उमरी तालुक्यातील शिवभक्त व पदाधिकारी आज दिल्लीकडे रवाना झाले असता त्यांना आ राजेश पवार यांनी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत