सोलापूर : येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) मधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातर्फे “Cloud Integrated Embedded Systems” या विषयावर तीन दिवसीय राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) उत्साहात पार पडला. २०, २१ आणि २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या कार्यशाळेला अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी मोठा प्रतिसाद दिला.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), सोलापूर लोकल सेंटर आणि अर्णव इन्फोटेक यांच्या सहकार्याने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत जोशी उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी क्लाउड कम्प्युटिंग आणि एम्बेडेड सिस्टिम्समधील वाढत्या संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख कौशल्यांची गरज यावर प्रकाश टाकला. प्राध्यापकांनी तंत्रज्ञानातील अद्ययावत बदल स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेत उद्योग तज्ज्ञ डॉ. वैभव डी. बचुवार आणि डॉ. प्रसन्न एम. गव्हाणे (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सहभागींना AWS (Amazon Web Services), MQTT प्रोटोकॉल, ESP8266/ESP32 मायक्रोकंट्रोलर, सेन्सर इंटिग्रेशन आणि रिअल-टाइम डॅशबोर्ड निर्मिती यावर सखोल प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. विशेषतः AWS EC2 सर्व्हर सेटअप आणि IoT कम्युनिकेशनचे थेट अनुभव प्राध्यापकांना देण्यात आले.
समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इंजि. ओमप्रकाश दरक उपस्थित होते. त्यांनी अशा कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या महत्त्वाबद्दल सहभागींचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर ए. पाटील, सचिव श्री. शिवानंद एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार आणि विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. बी. साबळे यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्रा. आर. डी. मैत्री, प्रा. एस. एन. कांबळे व प्रा. एम. एस. बिराजदार यांनी करून दिली.
एफडीपीचे समन्वयक प्रा. एस. जे. लिगाडे यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. आभार प्रदर्शन डॉ. आर. व्ही. दरेकर यांनी केले. आयोजन समितीतील प्रा. एस. आर. साखरे, प्रा. एस. पी. कटके, प्रा. एस. एस. मेटागर, प्रा. आर. बी. बिराजदार तसेच तांत्रिक सहाय्यक एन. एस. अळगी, पी. बी. वालिकर आणि विद्यार्थी समन्वयक प्रथमेश रामपोगु यांनी परिश्रण घेतले.
























