अकलूज – समाज मनाचा आरसा असणारे पत्रकार हे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत.पत्रकार बंधुंनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”शरीर माध्यम खलू धर्म साधनम्”या ब्रिद वाक्याप्रमाणे शरीर निरोगी सर्व साधनांचे माध्यम आहे .असे मत अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रसिध्द ह्रदय योगतज्ञ डॉक्टर एम.के.इनामदार यांनी व्यक्त केले.
सालाबादप्रमाणे या वर्षी ही अश्विनी हॉस्पिटल आणि माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी डॉक्टर एम.के.इनामदार यांनी केली.त्यावेळी त्यांनी पत्रकारांना निरोगी आरोग्यचा कानमंत्र दिला.
ते म्हणाले,पुर्वी साठ वर्षांनंतर ह्रदय विकार व्हायचा मात्र सध्या २५-३० वर्षांचे तरुण ही त्या आजाराचे बळी पडताना दिसतात.याचे मुख्य कारण म्हणजे बदलेली जीवनशैली,दुषित अन्न ,पाणी आणि नकारात्मक विचारसरणी असुन आजाराचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे.
सध्या कोविड लसीमुळे ह्रदय विकार वाढल्याची चर्चा होतेय, मात्र लसीचा आणि ह्दय विकारांचा काही संबंध नसल्याचे यावेळी डॉक्टर इनामदार यांनी स्पष्ट केले.
वाढता कर्करोग ही भिषण समस्या असुन भेसळ युक्त अन्न पदार्थ,विविध किटक नाशके हे याचे मुळ असुन नागरीकांनी स्वतः परसबागेत गरजेपुरती भाजी पाला लावणे आवश्यक असल्याचे सांगत निरोगी आयुष्याचा मुलमंत्र दिला.
सदर तपासणी शिबिरासाठी हाँस्पिटल मधील सहकारी शैलेश कुलकर्णी, कोंडाजी (कुमार) महादेव म्हावरकर, विनोद प्रल्हाद देवकुळे, प्रतीक्षा ज्ञानदेव खिलारे, वैभव नरेंद्र खैरमोडे, विकास साठे, मयुरी गणेश काटे, राहुल दिलीप बोडगे, संभाजी शिवाजी पाटोळे, साजिद रशीद शेख, रोहित सुरेश इंगळे, जयसिंग थोरात, दिलीप नामदेव नवगन यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मुद्रित, विविध समाज माध्यमे व युट्यूब पोर्टलचे पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार रामचंद्र मगर तर आभार जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांनी मानले.


























