विधानसभा निवडणुका कधीही घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल:- जयंतराव पाटिल
भोकरदन विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच असेल:- खासदर अमोल कोल्हे
भोकरदन:- शिवस्वराज्य रथ यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप भोकरदन येथे करण्यात आला यावेळी महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीस घाबरत असून विधानसभा निवडणुका कधीही घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटिल यांनी व्यक्त केला तर सभेतील गर्दी व उत्साह पाहून भोकरदन विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच असेल असे खासदर अमोल कोल्हे यांनी सांगीतले.
अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य रथयात्रा आयोजित करण्यात आली असून काल रविवार रोजी सायंकाळी ७:३० वाजता भोकरदन येथे शिवस्वराज्य रथयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप करण्यात आला. शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी भोकरदन जाफराबाद मतदार संघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ढोल, ताशे आणि हलगी वाजवत सभेचे आयोजक माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालयापासून सभास्थळापर्यंत तब्बल तीन किलोमीटरची रॅली काढून सभेत सहभागी झाले, यावेळी झालेल्या सभेत माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नावाच्या घोषणेने कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते.भोकरदन येथील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेस जमलेल्या गर्दी व कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून भोकरदन विधानसभेचा आमदार चंद्रकांत अण्णा आपलाच असेल हे सांगण्याची गरज नाही
असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्यानंतर सभागृहात टाळ्या आणि शिट्या वाजवत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी महायुतीचे सरकार निवडणुकींना घाबरत असून त्यामुळेच निवडणुका पुढे लोटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मात्र निवडणुका कधीही घ्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल असे सांगितले तर कार्यकर्त्यांनी संयमाने निवडणुकीला सामोरे जावे व बेरजेचे राजकारण करून आपल्या उमेदवारास विजयी करावे असे सांगितले तर शरदचंद्र पवार साहेबांचे विचार सर्व घटकांना आणि समाजाला न्याय देऊ शकतात असे
माजी पालकमंत्री आमदार राजेश टोपे यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोकरदन विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी भाजपाचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या वर टिका करताना सांगीतले की, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सत्तेचा फायदा फक्त कुटुंबासाठीच करून घेतला त्यामुळे जनतेने त्यांचा पराभव केला तर आता विधानसभेत देखील त्यांच्या मुलाचा मतदारसंघातील जनता पराभव करेल असे सांगितले यावेळी त्यांनी मतदार संघातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,
खतावरील व औषधांवरील जीएसटी कमी करण्यात यावा, खतांना अनुदान देण्यात यावे याच सोबत मतदार संघातील बोगस कामांचा भविष्यात निवडून आल्यानंतर पाठपुरावा करून चौकशी व कार्यवाही करण्याचे काम केल्या जाईल असे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक तालुकाध्यक्ष प्रा. डॉ.अंकुश जाधव यांनी केले तर यावेळी नितेश कराळे सर, ॲड.संजय काळबांडे, सुधाकर दानवे, रामधन कळंबे, रमेश शेठ सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नईम कादरी यांनी केले. शिवस्वराज्य रथ यात्रेच्या भोकरदन येथील सभेत डॉ.निसारजी देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडीत कांबळे, नागेश फाटे, नितेश कराळे, संजय काळबांडे,कपील आकात, सुरेश खंडागळे, राम शिरसाठ, युवा नेते सुधाकर अण्णा दानवे, सुरेखा लहाने,रमेश शेठ सपकाळ, रामधन पाटील कळंबे, प्रा. डॉ. अंकुश जाधव, लक्ष्मण ठोंबरे, संग्रामराजे देशमुख यांच्यासह इतर आजी-माजी पदाधिकारी,तालुका अध्यक्ष ,शहराध्यक्ष,सरपंच, उपसरपंच,कार्यकर्ते,पत्रकार बांधव,विविध चॅनल मिडिया प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.