Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ बाबासाहेब आंबेडकर नूतनीकरण स्मारकाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 19, 2024
in solapur
0
डॉ बाबासाहेब आंबेडकर नूतनीकरण स्मारकाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न
0
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन युवराज पगारे : शहरातील सिल्लोड कॉर्नर वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा नूतनीकरण सोहळा रविवारी 18 रोजी पूज्य भदंत एस प्रज्ञाबोधी,पुज्य भदंत शिवली शाक्यपुत्र तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.

तसेच यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचेही उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व उद्घाटक डॉ भीमराव आंबेडकर साहेब यांनी यावेळी भ्रमध्वनीद्वारे जनतेशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे होते तर आ संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी सभापती सुदमराव सदाशिवे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव,डॉ संजय पगारे,महेंद्र बनकर,चंद्रकांत पगारे, आशा माळी,रेखाताई पगारे, प्रा डॉ अंकुश जाधव, केशव जंजाळ,मुकेश चिने, इरफानोद्दीन सिद्दीकी,नानासाहेब वानखेडे, रमेश सपकाळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथम भदंत एस प्रज्ञाबोधी व भदंत शिवली शाक्यपुत्र यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर भदंतांनी बुद्ध धम्म वंदना घेतली. यावेळी प्रथम परम पुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्वेसर्वा सचिन पारखे यांनी आपल्या प्रास्ताविकात त्यांचे आजोबा रायभान पारखे यांनी जागा मिळविण्यासाठी व पुतळा उभा करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा आढावा घेत सदरील कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक दीपक बोर्डे, युवा नेते प्रदीप जोगदंडे तसेच सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळ, स्मारक समितीचे पदाधिकारी,भारतीय बौद्ध महासभा,डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन,सम्राट भोगवर्धन बुद्ध विहार समिती,सुजाता महिला मंडळ तसेच समस्त बौद्ध समाज शहर व तालुका या सर्वांचे आभार मानले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी सभापती सुदमराव सदाशिवे यांच्या भाषणाचा दाखला देत शहरातील बुद्धीविहार व पुतळ्यांच्या सुशोभीकरण करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. विहार समितीच्या वतीने तात्काळ समिती गठीत करावी असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनतेला केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी अत्यंत देखण्या सुशोभीकरण सोहळ्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. राजाभाऊ देशमुख, हर्षकुमार जाधव यांनी ही आपले विचार मांडले.

त्यानंतर अंत्यत उत्साहात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्युत रोषणाई व डीजेच्या तालावर तरुणाई अत्यंत उत्साहात थिरकली.
कार्यक्रमास शहर व तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला त्यात महिलांची संख्या मोठी होती हे विशेष.
दरम्यान, रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री राजेश टोपे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

Post Views: 35
Previous Post

भाऊ नसलेल्या राजश्रीताई बांधतात आदिवासी मुलांना राखी

Next Post

शिवस्वराज्य यात्रेस भोकरदन येथे लोटला विराट जनसमुदाय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिवस्वराज्य यात्रेस भोकरदन येथे लोटला विराट जनसमुदाय

शिवस्वराज्य यात्रेस भोकरदन येथे लोटला विराट जनसमुदाय

ताज्या बातम्या

सभापती चाकोतेंनी डेन्मार्कमधून मोदींच्या चाहत्यांची क्लिप व्हायरल केली #viral

May 21, 2026

माझ्या लेकराला वाचवा हो म्हणत आईने फोडला टाहो #solapurnews #viral

May 21, 2026

एलपीजीला पार्याय ; बालाजी अमाईन्सचे डायमिथाईल इथर निर्मितीत पाहिले पाऊल #solapurnews #marathinews

May 21, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873526

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697