सोलापूर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी टिळक भवन मुंबई येथे प्रदेश प्रतिनिधी व सर्व जिल्हा अध्यक्ष यांची संयुक्त बैठक व एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे स्वागत महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात म्हणाले की पदभार घेऊन एक वर्षपूर्ती झाली आहे. येणाऱ्या काळात राज्यात गाव तेथे काँग्रेस शाखा स्थापना करणार असून पूर्णपणे संघटना बांधणीकडे लक्ष देणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. तसेच सरकार विरोधात ज्वलंत समस्येच्या अनुषंगाने कायमस्वरूपी आंदोलन उभारण्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील या माजी मंत्र्यांसह पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार रामहरी रुपनर, जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, प्रदेश सचिव सुरेश हावळे ,अॅड. कोळेकर रणखांबे, मोतीराम चव्हाण , सेवादलाचे प्रमुख सुदीप चाकोते आदी उपस्थित होते.


























