जिल्हा परिषद प्रशाला परतुर मध्ये उर्दू माध्यम नववी वर्ग सुरू करण्यासाठी परतुर येथील मुस्लिम शिष्टमंडळाने आमदार लोणीकर यांची घेतली भेट.
परतूर / प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात ५ ठिकाणी दर्जावाढ प्रमाणे इयत्ता ९वी चा वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, याच प्रकारे परतुर जिल्हा परिषद प्रशालेत उर्दू माध्यमाचा वर्ग मंजूर व्हावा याकरिता प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता, परंतु सदर प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबित आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झालेली आहे. करीता माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन मुसलिम समाजाच्या वतीने निवेदन सादर केले,
मुस्लिम समाज शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागास आहे, अल्पसंख्याक विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावे याकरिता सदरचा वर्ग मंजूर करणे अत्यंत गरजेचे आहे.
वास्तविक पाहता परतूर शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तसेच विद्यार्थी संख्या उपलब्ध आहे, व परतुर मध्ये उर्दू माध्यमाची माध्यमिक शाळा एकच आहे, यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून अल्प संख्याक समाजाची जनभावना लक्षात घेऊन परतूर जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता ९वी उर्दू माध्यमाचा वर्ग मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली.व या बाबत सखोल चर्चा करण्यात आली, लोणीकर यांनी या बाबत शिक्षण अधिकारी यांच्याशी याबाबत विसतृत्त चर्चा करून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन दिले.