सोलापूर – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून दक्षिणमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी मंगळवारी इच्छुकांनी गर्दी केल्याचे दिसून आले . भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र यावेळी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी निश्चित नसल्यामुळे एका जागेसाठी पाच पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी २० जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समिती गणासाठी ४६ एकूण ६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढल्याचे दिसून येत आहे.
१६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सोमवारपासून इच्छुकांकडून अर्ज भरण्यात येत आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी असून २० जानेवारी रोजी अनेक दिग्गजांकडून उमेदवारी दाखल करण्यात आले. सर्वच पक्ष उमेदवारी निश्चित न करता अर्ज दाखल करण्यास सांगितले आहेत . त्यामुळे एका गटात एकाच पक्षाकडून चार ते पाच इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये व इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये, यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एबी फॉर्म शेवटच्या क्षणाला देणार असल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. मंगळवारी दक्षिण तहसील कार्यालयात अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती .
…
चौकट
….
दक्षिणमधील उमेदवारी दाखल
संख्या
…
जिल्हा परिषद गट …
बोरामणी .. ४, कुंभारी ८, वळसंग १ , हत्तूर ३, मंद्रूप ४ व भंडारकवठे ३ … एकूण …२३
पंचायत समिती गण …
कासेगाव १ , बोरामणी .. ४, कुंभारी ८, धोत्री १ , वळसंग ४, होटगी ४ , हत्तूर ७, औराद ३, मंद्रूप ४, कंदलगाव ३, भंडारकवठे १ व निंबर्गी ६ .. एकूण … ४६
….
यांनी भरला अर्ज
…,
सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी मागणी अधिक असल्याने उमेदवारी अनिश्चितता आहे. मात्र मंगळवारी सुरेश हसापुरे, इंदुमती अलगोंडा पाटील, सोनाली कडते , धनशे अचलारे, उज्वला हविनाळे, सविता मेंडगुदले, मळसिध्द मुगळे, शितल राठोड, रामप्पा चिवडशेट्टी, संदिप टेळे यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज बुधवार दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















