अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे मराठी विभाग व सेवक अकादमी यांचे संयुक्त विद्यमाने येथे ‘लेखक आपल्या भेटीला’ हा विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते ज्येष्ठ साहित्यिक, ज्यांच्या लेखणीने मराठी साहित्य समृद्ध केलेले डॅा सदानंद देशमुख!
डॅा सदानंद देशमुख यांच्या साहित्याचा प्रवास उलगडणारी अभ्यासपूर्ण आणि रसाळ मुलाखत प्रा. विनायक सूर्यवंशी सरांनी घेतली. या संवादातून लेखकाचे विचार आणि साहित्यामागची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.पुस्तकातील अक्षरं जेव्हा प्रत्यक्ष लेखकाच्या मुखातून उमलतात, तेव्हा ज्ञानाचा खरा सोहळा होतो! हा अनुभव प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी घेतला” अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॅा एस के टिळेकर होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती आणि साहित्याबद्दलची आवड निश्चितच वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापक या कार्यक्रमाला गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॅा जनार्दन परकाळे यांनी केले तर आभार डॅा संजय वाघमारे यांनी मानले.
























