अ.नगर : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आस्थापना बंद करीत असताना शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या पथकाने शहरातील कोठला परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या तिरट नावाच्या हारजीतीच्या जुगार अड्डयावर छापा टाकून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १,३०,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बुधवार, दि. 18 डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 20 जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स.पो.नि. गणेश वारुळे, पो. हे.कॉ. गणेश चव्हाण, चालक पो. हे. कॉ. सचिन मिरपगार, पो. कॉ. सुजय हिवाळे, इनामदार, रमेश शिंदे, कदम आणि आर पी सी पथक यांनी केली.



























