मोहोळ – मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवकासाठी लागलेल्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २८ नगर सेवक पदाच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता नगरसेवक पदासाठी ९७ उमेदवार रिंगणात उभे आहेत . तर जनतेतून निवडल्या जाणाऱ्या महिला नगराध्यक्ष पदासाठी ११ महिला उभ्या राहिल्या आहेत
नगराध्यक्ष पदासाठी
शीतल सुशिल क्षिरसागर भाजप , उज्वला अमर कांबळे, (शिवसेना ठाकरे गट) , सिद्धी राजू वस्त्रे शिवसेना (शिंदे), सोनल विठ्ठल जानराव (राष्ट्रीय कॉंग्रेस आय), अश्वीनी संदीप जाधव (राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट) , सखुबाई तुकाराम क्षिरसागर (वंचीत बहुजन आघाडी), मुक्ता अमोल खंदारे , प्रिती राजेंद्र घाडगे , शुभांगी नागनाथ क्षिरसागर , आरती राजरत्न क्षिरसागर, अंजली अशोक वस्त्रे (अपक्ष ) आदी ११ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी नशीब अजमावत रिंगणात उतरलेआहेत .
नगरसेवक पदासाठी भरलेल्या उमेदवारी माघारी घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाचे नूतन जिल्हा चिटणीस महेश सोवनी,उबाठा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विक्रम पंडित देशमुख, भारतीय मजदूर संघाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र गाडे पाटील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड यांचे चिरंजीव शिवरत्न गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष यशोदा कांबळे आदींसह २८ जणांनी अर्ज माघारी घेतले..

















