नरखेड – मोहोळ तालुक्यातील एकुरके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या बाल आनंद बाजारामध्ये एकूण 30 स्टॉल मधून 20 हजारांची उलाढाल होऊन बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात साजरा आला. या बाल आनंद बाजाराचे उद्घाटन सरपंच शशिकांत कोल्हाळ यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश कोल्हाळ अजित ढवण, प्रवीण पाटील, प्रकाश कोल्हाळ यांच्या उपस्थित संपन्न झाला. प्रत्यक्ष व्यवहार व गणित याच्या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानासाठी भरवण्यात आलेल्या बाल आनंद बाजारामध्ये अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला .
बाजारा मध्ये होणारी व्यापाऱ्यांची विक्रीची चढाओढ ही बालकांमध्ये ही दिसून आली . अनेक प्रकारच्या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती . खाद्यपदार्थ, पालेभाज्या, फनी गेम्स, उसाचा रस,आईस्क्रीम,यासह गावरान मेवा ही उपलब्ध करण्यात आला होता . यावेळी मुख्याध्यापक सुधाकर काशीद, शिक्षक चंद्रकांत बसवंत, श्रीकृष्ण पाटील, निर्मला भालशंकर मॅडम, मीनाक्षी काशीद मॅडम, यांच्यासह अर्चना मोटे सचिन मोटे यांनी परिश्रम घेतले . शाळेच्या पटांगणावरती स्टॉलच्या उभारणी साठी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी साहित्याची ने आण करून परिश्रम घेतले .
यावेळी प्रवीण मोटे, राजकुमार साठे औदुंबर ढवण भीमराव मोटे गुरुजी, शिवाजी मोटे , रवींद्र ढवण, अजित ढवण, नामदेव कोल्हाळ, आत्माराम कारंडे,नानासाहेब साठे अरविंद साठे, अमर ढवण आदि उपस्थित होते . फोटो सोबत पाठवला आहे.

















