सांगोला – महुद ते सांगोला रोडवर ढाळेवाडी पाटी येथे शनिवार दि.२५ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास युनिव्हाच्या धडकेने महिला ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, महुद ते सांगोला रोडवर महुद हद्दीत सकाळी अकराच्या सुमारास ढाळेवाडी पाटी येथे संगीता बापू ढाळे (वय-५२) रा.ढाळेवाडी, महुद ता.सांगोला ह्या रोड क्रास करत असताना युनिव्हा नं.एमएच ०२ एएल ५४१० चे अनोळखी चालकाने धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत महादेव बापु ढाळे, रा.ढाळेवाडी, महुद, ता.सांगोला यांनी युनिव्हाचे अनोळखी चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हयगयीने भरधाव वेगात निष्काळजी पणे रोडचे परस्थितीचा विचार न करता चालवुन रोड क्रास करत असलेले सावत्र आई संगीता बापू ढाळे हिस जोराची धडक देवून तिला गंभीर जखमी करून तिचे मरणास कारणीभुत झाला आहे अशी फिर्याद सांगोला पोलीस ठाणे येथे दिली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.



















