तू, जर मला पैसे मागितले तर तुझ्यावरती बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन’, अशी धमकी एका तरुणीनं मिनाज हत्तुरे याला दिलीय. याप्रकरणी लवनीत कौर नामक तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यावर तिनं मिनाज हत्तुरे याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ट्रेडिंग अकाउंट उघडून देण्याच्या बहाण्याने जवळपास ९ लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केलीय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील कर्णिक नगरातील रहिवासी मिनाज रशिद हत्तुरे याची जुलै २०२३ मध्ये लवनीत कौर हिची इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली.
त्यानंतर उभयतांच्या भेटी-गाठी देखील झाल्या. त्यावेळी लवनीत कौर हिने मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडींग करते. तु माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविलेस तर तुझे ट्रेडिगसाठी अकांऊट काढून देते, तुला चांगला नफा मिळवून देते, असे सांगितल्यावर मिनाज हत्तुरे यांनी तिला होकार दिला. त्यानंतर ०९ नोव्हेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत मिनाज हत्तुरे यांनी वेळोवेळी नवनीत कौर हिच्या मोबाईलवर गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे रक्कम पाठवित गेला. तिने ऑनलाईन व कॅश स्वरूपात हत्तुरे याच्याकडून ९,२२,००० रूपये इतकी रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली.लवनीत कौर ही ट्रेडींग करत नसल्याचे मिनाज यास समजले, तेव्हा त्याने तिच्याकडे पैसे मागितले असता, तिने … अन्यथा तुझ्याविरुद्ध बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिलीय.
याप्रकरणी मिनाज हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ९ लाख २२ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी लवनीत कौर (रा- मिरा अपार्टमेंट, सेक्टर १२, प्लॉट नं. २०० राधेकृष्ण मार्ग, वाशी, नवी मुंबई. मुळ रा- चंदीगढ-पंजाब) हिच्याविरुद्ध भादवि ४२०,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा अधिक तपास पोसई बनसोडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.